Crop Insurance Update: रब्बी पीक विमा अर्जासाठी 15 तारखे पर्यंत मुदत, लवकर काढा पिक विमा

Crop Insurance Update: नमस्कार शेतकरी मित्रांनो, सध्या सर्वत्र पाऊस होत असल्याकारणाने शेतकऱ्यांच्या पिकाचे भरपूर प्रमाणात नुकसान झालेले आहे. प्रधानमंत्री पिक विमा योजनेत गेल्यावर्षी 7.5 लाख शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता. आणि यावर्षी देखील 7 पटीने जास्त सहभाग वाढलेला दिसून येत आहे.

Whatsapp Group
Whatsapp Channel
Telegram channel

विमाधारकांची संख्या शेतकऱ्यांची तब्बल 49 लाख 24 हजार पर्यंत पोहोचलेली आहे. सध्या रब्बी पिक विमा योजनेअंतर्गत करडई, हरभरा तसेच गहू या पिकासाठी 15 डिसेंबर 2023 पर्यंत पिक विमा भरण्याची लास्ट ची मुदत देण्यात आलेली आहे. त्यामुळे विमाधारकांचे संख्या आणखीन वाढवण्याची शक्यता कृषी विभागाने व्यक्त केली आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांनी 15 तारखेपर्यंत पिक विमा भरून घ्यावा अशी विनंती केली जात आहे. 32 लाख हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित आहे. प्रधानमंत्री पिक विमा योजने अंतर्गत मागच्या वेळेस केवळ एक रुपया मध्ये तुम्हाला पिक विमा काढता आला होता. यंदा राज्य सरकारला सुमारे 803 कोटी एवढे रुपयांचा पिक विमा द्यावा लागणार आहे.

तसेच केंद्र सरकारला 595 कोटी रुपयांची भर यात टाकावी लागणार आहे. विमा कंपन्यांना एकूण 1439 कोटी रुपयांचा हप्ता देखील द्यावा लागणार आहे. अंतिम मुदत 15 तारखेपर्यंत असल्याकारणाने यात आणखीन जास्त शेतकऱ्यांची संख्या वाढण्याची शक्यता सूत्रांनी दिलेली आहे. लातूर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक शेतकरी आहेत.

त्यामध्ये 18 लाख 25 हजार शेतकऱ्यांनी यात सहभाग नोंदवला आहे. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर विभागातील 17 लाख 46 हजार शेतकऱ्यांनी पिक विमा काढलेला आहे. आणि तसेच पुणे विभागांमध्ये पुणे विभागात तिसऱ्या क्रमांकावर आहे. येथे सुमारास 7 लाख शेतकऱ्यांनी या पिक विमा योजनेमध्ये सहभाग घेतलेला आहे. कोकणामधील केवळ 28 शेतकऱ्यांनी फक्त पिक विमा काढलेला आहे.

जर शेतकरी मित्रांनो तुम्हाला देखील रब्बी पिक विमा साठी अर्ज करायचा असेल. तर तुम्हाला लास्ट ची तारीख म्हणजे अंतिम तारीख १५ डिसेंबर 2023 आहे. त्याच्या अगोदर तुम्ही आपला पिक विमा ऑनलाईन पद्धतीने भरू शकता.